Phaltan Doctor Case : गोपाल बदने 48 तासानंतर पोलिसांना शरण, उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी
Continues below advertisement
फलटण (Phaltan) उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या (Doctor Suicide) प्रकरणात मुख्य आरोपी निलंबित PSI गोपाळ बदने (Gopal Badane) पोलिसांना शरण आला आहे. मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये 'PSI गोपाळ बदने यानं चारवेळा बलात्कार केला', असा गंभीर आरोप केला होता. 'रक्षकच भक्षक' ठरल्याच्या या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. ४८ तास फरार राहिल्यानंतर बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला. वैद्यकीय तपासणीवेळी ABP माझाशी बोलताना, 'माझा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे', अशी प्रतिक्रिया त्याने दिली. या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बंडकर (Prashant Bandkar) याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या फलटण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बदने शरण आल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement