TOP 100 Headlines : 2 PM : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 OCT 2025 : ABP Majha
Continues below advertisement
फलटण (Phaltan) महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी प्रशांत बनकर (Prashant Bankar) याला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी गोपाळ बदने (Gopal Badne) फरार आहे. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा', अशी थेट मागणी दानवे यांनी केली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची चौकशी सातारा जिल्ह्याबाहेरील महिला अधिकाऱ्यांमार्फत करण्याची मागणी केली आहे, तसेच माजी खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांना सहआरोपी करण्याची आणि पोलीस अधिकारी महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 'लाडक्या बहिणीपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज आहे', असा टोलाही दानवे यांनी सरकारला लगावला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement