Ambadas Danve On Devendra Fadnavis डॉक्टरवर दबाव टाकणाऱ्यासोबत फडणवीस बसणार,सरकारवर दानवेंचा निशाणा

Continues below advertisement
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यावर टीका करत महायुती सरकारला धारेवर धरले आहे. 'देवा भाऊंच्या सरकारमध्ये महिलांचा अपमान,' असे थेट ट्वीट करत दानवे यांनी एका महिला डॉक्टरवर दबाव टाकणाऱ्या व्यक्तीसोबत मुख्यमंत्री व्यासपीठावर बसणार असल्याचा आरोप केला आहे. फलटण येथील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी एका व्यक्तीवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. हे महायुती सरकार चुकीची कामं करणाऱ्यांना पाठीशी घालत असून, एका कर्तव्यदक्ष डॉक्टरची या सरकारच्या लेखी काय किंमत आहे, हे फडणवीसांच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्राला कळेल, असेही दानवे म्हणाले. त्यांनी 'कायद्याचं न उरले भान, देवा भाऊंच्या सरकारमध्ये महिलांचा अपमान' अशा शब्दांत सरकारवर निशाणा साधला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola