Nashik : PFI सदस्य मौलाना इऱफान खान नदवीला 14 दिवसांची एटीएस कोठडी ABP Majha
Continues below advertisement
नाशिकच्या मालेगावमधून अटक केलेल्या मौलाना इऱफान खान नदवी याला न्यायालयानं 14 दिवसांची एटीएस कोठडी दिली आहे. नदवी याला रविवारी अटक करण्यात आली होती. मालेगावच्या जामा मशिदीत मौलवी म्हणून कार्यरत असलेला नदवी पीएफआय संघटनेचा 2019 पासून सदस्य होता. नुपूर शर्मा प्रकरणानंतर त्यानं औरंगाबाद, बीड, जालना आणि नांदेड या जिल्ह्यांत दंगल भडकविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या आरोपींशी फोनवरून सांकेतिक भाषेत संभाषण केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.
Continues below advertisement