Truck Driver Strike : हा संप ट्रान्सपोर्टर ड्रायव्हर्सचा, पेट्रोल पंप चालकांचा सहभाग नाही : उदय लोध
Truck Driver Strike Petrol Shortage : मुंबई : हिट अँड रन कायद्याविरोधात (New Hit and Run Law) ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप (Transport Union Strike) पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस (Second Day Of Strike) आहे. त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्याने नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर मोठ्या रांगा लावल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळाकडे दोन दिवस पुरेल एवढाच डिझेलचा पुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे ट्रकचालकांच्या संपाचा एसटीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
शासनाचा हिट अँड रन कायद्याची अंमलबजावणी होण्यास अद्याप वेळ आहे. टॅंकर्स दोन प्रकारच्या असतात. एक डीलर्सच्या त्याना DCT म्हणजे Dealer cum Transporter म्हणतात. तर दुसऱ्या नुसत्याच पेट्रोल डीझेल वाहतुक करणाऱ्या म्हणजे ट्रान्सपोर्टरच्या असतात. त्यांचे पेट्रोल पंप नसतात. सदरचा संप हा ट्रान्सपोर्टरच्या ड्रायव्हर्सचा असुन त्यात पेट्रोल पंप चालकांचा कोणताही सहभाग नाही. दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन फामफेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी केले आहे. सध्या राज्यातील पेट्रोल आणि डिझेलची काय परिस्थिती आहे याबाबत उदय लोध यांनी काय माहिती दिली पाहूया...