Petrol Hike : 16 दिवसात 10 रुपयांनी वाढलं पेट्रेल, सर्वाधिक 123 रुपये प्रतिलिटरचा दर परभणीत
इंधन दरवाढीचा वेग वाहनांच्या वेगापेक्षा अधिक आहे की काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण गेल्या 16 दिवसात तब्बल 14 वेळा इंधन दरवाढ झाली असून पेट्रोलचे दरही 16 दिवसात 10 रुपयांनी वाढले आहेत. आजही पेट्रोल आणि डीझेल प्रत्येकी 83 पैशांनी महागलंय. राज्यात सर्वाधिक दर परभणीत असून तिथे पेट्रोल 123 रुपये प्रतिलिटर तर डीझेल 105 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे. वाढत्या इंधन दरामुळे शेतमाल, दूध यांची वाहतूक महागणार आहे.. पर्यायी महागाईचा भडका उडण्याची भीती आहे.