नांदेडमध्ये पेट्रोल शंभरीपार; गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 May 2021 01:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या चार ते पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल दरात सतत वाढ होत आहे. सततच्या वाढीमुळे सामान्यांचे लॉकडाऊनमधील बजेट मात्र कोलमडलं आहे. आज नांदेड जिल्ह्यात पेट्रोल चे दर 100 रुपये 54 पैसे तर डिझेल दर 90 रुपये 49 पैसे झाले आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसलीय. काल पेट्रोलचे दर पेट्रोल 100 रुपये 4 पैसे होते, तर डिझेल 89 रुपये 92 पैसे होते. तर आज पेट्रोल मध्ये 51 पैशाने तर डिझेल मध्ये 57 पैशाने वाढ झाली आहे.