Petrol Diesel Price hike | पेट्रोल-डिझेलच्या दरांत उच्चांकी वाढ; मुंबईत पेट्रोल 91.56 तर डिझेल 81.70
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्यानं वाढ होत आहे. मंगळवारीसुद्धा राज्यात बहुतांश भागांमध्ये पेट्रोलच्या दरांनी नव्वदी पार केली, तर डिझेलचे दरही प्रतिलीटर 80 रुपयांपलीकडेच असल्याचं पाहायाला मिळालं. वाहन इंधनाच्या दरात होणारी वाढ सर्वसामान्य वाहन धारकांपुढं आता मोठी आव्हानं उभी करत आहे. फक्त राज्यातच नव्हे, तर देशातही हीच परिस्थिती आहे.