Petrol Diesel च्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, पेट्रोल आणि डिझेल 80 पैसे प्रति लिटरने महागलं
Continues below advertisement
Petrol Diesel Price Hike : इंधन दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल प्रत्येकी 83 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत. मंगळवारीही पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 114 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या आहेत.
Continues below advertisement