Peter Van Geit | एका अवलियाची महाराष्ट्र भ्रमंती | ABP Majha
Continues below advertisement
हाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. शिवरायांच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या किल्ल्याचं आकर्षण परदेशातही आहे. त्यामुळे मुळचे बेल्जियमचे असलेले पिटर वॅनग्या गड किल्ल्यांनी भारावून गेले आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना आधी फार माहिती नव्हता. पण प्रत्येक किल्ल्यानुसार त्यांना तो इतिहास उलगडत गेला. इथल्या स्थानिकांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल एखाद्या देवासारखा आदर आहे असं जाणवल्याचंही त्यांनी सांगितलं. या सगळ्या भ्रमंतीच्या दरम्यान स्थानिक लोकांच्या आदरातिथ्याचा पिटर यांनी आवर्जून उल्लेख केला. पिठलं भाकरीच्या तर ते विशेष प्रेमात पडले. फिरण्याच्या आवडीसाठी पिटर यांनी काहीवर्ष आधी नोकरी सोडली.
Continues below advertisement