Pune Waterfall Accident : शिवदुर्गा बचाव पथकाची कामगिरी ड्रोन मध्ये कैद

Continues below advertisement

सह्याद्रिच्या पर्वतरांगांमध्ये ट्रेकींगसाठी जाणं आपल्यापैकी अनेकांचा छंद असेल. पण अशा ठिकाणी जाताना काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण पर्वतरांगांमध्ये बचावकार्य करणंही अत्यंत कठीण असतं. असाच प्रकार पुण्यातल्या लोणावळा इथं घडलाय. कातळधर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका तरुणीचा निसरड्या दगडावरुन पाय घसरला. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली पण तिच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तिथुन गाडीपर्यंत चालत येणं या तरुणीला शक्य नव्हतं. तिचे साथीदारही तितक्या ताकदीचे नव्हते. पण याच ठिकाणी दुसऱ्या ग्रुपसोबत आलेल्या प्राजक्ता बनसोड या तरुणीनं तिची मदत केली. प्राजक्ता ही शिवदुर्ग बचाव पथकाची सदस्य असल्याने तात्काळ तिनं लोणावळ्यातील आपल्या पथकाला फोन केला. काहीच वेळात बचाव पथक तिथे दाखल झालं. त्यांनी तरुणीला प्राथमिक उपचार दिले आणि स्ट्रेचरच्या सहाय्याने तरुणीला बाहेर काढलं. हा सगळा थरार दक्ष काटकर यांनी ड्रोनच्या माध्यमातून कैद केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram