WEB EXPLAINER : Modi सरकारची लसीकरणात जोरदार आघाडी, रोज 1 कोटी नागरिकांचे लसीकरण ABP Majha
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती घेतली आहे. एकाच दिवसात देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून हा एक जागतिक विक्रम आहे. भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत कोरोनाच्या लसीचे 62 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.