Konkan | नियमांचं पालन करून कोकणात एसटीने जाता येणार! चाकरमान्यांवरून राजकारण करू नये - अनिल परब

Continues below advertisement

एसटी महामंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान कोकणात जादा गाड्या सोडल्या जातात. तसेच चाकरमान्यांच्या मुंबईतील मंडळांकडून ग्रुप बुकिंगही मोठ्या प्रमाणात होते. हे बुकिंग 45 दिवस आधी करणे अपेक्षित असते. यंदा रेल्वेने प्रवासाची शक्यता धुसर असल्याने चाकरमान्यांना एसटीच्या जादा बसेसचा आधार होता. एसटी महामंडळाने आता चाकरमान्यांसाठी एसटी बसेस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी चाकरमान्यांसाठी विशेष एसटी बस सोडल्या जातील, असे सांगितले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram