Weekend Tourist Rush : वीकेण्ड फीव्हर आणि पर्यटकांची चंगळ, सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळं गजबजली
Continues below advertisement
सलग सुट्ट्यांमुळे कोकणातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरून गेली आहेत. कोकणातील समुद्र किनाऱ्यांसह मालवण मधील दांडी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. मौज मज्जा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक तळकोकणात दाखल झाले आहेत. मालवण बंदर, दांडी, चिवला समुद्र किनारा, रॉक गार्डन, तारकर्ली, देवबागसह सिंधुदुर्गमधील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. जलक्रीडा पर्यटनाचाही पर्यटक आनंद लुटत आहेत.
Continues below advertisement