Lockdown 3 | नियम आणि अटी पाळा नाहीतर पुन्हा लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही : हसन मुश्रीफ
Continues below advertisement
नियम आणि अटी पाळा नाहीतर पुन्हा लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. महिनाभर घरात थांबून मिळवलेलं चार दिवसात गमावून बसू, असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नागरिक कोरोनाला हरवल्यासारखं बाहेर फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.
Continues below advertisement