Pegasus : पेगॅसस खरेदीबाबत न्यूयॉर्क टाईम्सचा दावा, कॉंग्रेस नेत्यांकडून मोदी सरकारला सवाल
Continues below advertisement
पेगॅसस तंत्रज्ञानानं नेते, पत्रकार आणि महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवल्याचा आरोप झाल्यानंतर, आता न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात मोदी सरकारबाबत गौप्यस्फोट करण्यात आलाय. मोदी सरकारनं २०१७ साली संरक्षण सौद्याच्या पॅकेजमध्ये इस्त्रायलकडून पेगॅसस खरेदी केल्याचा खळबळजनक दावा न्यूयॉर्क टाईम्सनं केला आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीनंतर काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारला सवाल करत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलंय. सरकारनं याआधी त्याचा इन्कार केला असला तरी न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीमुळे भारतातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे. २०१७ साली भारतानं इस्रायलबरोबर मिसाईल खरेदीचा करार केला होता. त्यातच पेगॅसस खरेदी केल्याचा दावा न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात करण्यात आलाय.
Continues below advertisement