Pawar Alliance Buzz: Pimpri-Chinchwad मध्ये भाजपला रोखण्यासाठी काका-पुतणे एकत्र? Ajit Pawar-Supriya Sule यांच्यात बोलणी.

Continues below advertisement
पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भाजपला (BJP) रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन्ही गट, अर्थात शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गट, एकत्र येण्याची चिन्हे आहेत. या दोन गटांमध्ये प्राथमिक बोलणी झाल्याची माहिती समोर येत असून, लवकरच वरिष्ठ पातळीवर चर्चा अपेक्षित आहे. या संभाव्य युतीवर एका स्थानिक नेत्याने प्रतिक्रिया दिली की, 'भाजपचे विचार सोडून आमच्या सोबत येणार असशील तर शंभर टक्के आमचाही हात पुढे असेल...आम्ही थोडे कमी पानं घेऊ पण भाजपला इथे थांबवू'. ही भूमिका स्थानिक पातळीवर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याने, एकेकाळचा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी पवार कुटुंब एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola