Sharad Pawar 2 Options for NCP President : अध्यक्षपदासाठी पवारांनी ठेवले दोन पर्याय? चर्चा कुणाची?

Continues below advertisement

अध्यक्षपदासाठी शरद पवारांनी पक्षासमोर दोन नावं ठेवली, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा, सूत्रांची एबीपी माझाल माहिती..... पवारांकडून सुप्रिया, प्रफुल्ल यांचे पर्याय... अध्यक्षपदाबाबत निर्णय कायम ठेवल्यास पवारांनी राष्ट्रवादी समोर दोन पर्याय ठेवल्य़ाचं समजतंय.... राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा आहे... पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजलीये.. नवा अध्यक्ष कोण, नवे प्रदेशाध्यक्षही नेमणार का?, जिल्हा स्तरावरील समीकरणं कशी बदलणार? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, पवारांनी अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल असे दोन पर्याय ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आणि म्हणूनच, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका, त्यानंतर लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा चेहरा कोण असणार, आणि त्या चेहऱ्याच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला किती जागा मिळू शकतात, अशा नानाविध चर्चा पक्षात रंगू लागल्या आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram