Fraud Passport Visa : पासपोर्ट आणि व्हीसा देण्याचं आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Continues below advertisement
Fraud Passport Visa : पासपोर्ट आणि व्हीसा देण्याचं आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
उत्तर भारतातील पंजाब आणि हरियाणा राज्यांमधून परदेशात जाण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. परदेशात जाण्यासाठी आवश्यक असणारा पासपोर्ट आणि व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. मुंबईतल्या साकीनाका पोलिसांनी या प्रकरणात आठजणांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी दहा पोलीस स्थानकांची मिळून आठ तपास पथकं नेमण्यात आली होती. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार, मोबाईल फोन्स आणि अकरा लाख डॉलर्स असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींनी विविध तीन गुन्ह्यांमध्ये मिळून ४० लाख डॉलर्सची लूट केल्याची प्राथमिक माहिती आहे.
Continues below advertisement