Parvati Case Mother Reaction : पुणे पर्वती अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी द्या, आईची मागणी

Continues below advertisement

Parvati Case Mother Reaction :  पुणे पर्वती अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी द्या, आईची मागणी

Pune Crime Parvati Case: नसरापूरमधील चिमुरड्या मुलीच्या अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच पुणे शहरातील पर्वती भागात असाच एक चीड आणणारा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पर्वती येथील एका 70 वर्षांच्या वृद्धाने आपल्या स्वत:च्या नातीवरच अत्याचाराचा (Rape) प्रयत्न केला. या मुलीचे आई-वडील हे कामाला जातात. ते घरी नसताना या वृ्द्धाने घरातच नातीवर अतिप्रसंग (Sexual Assault) करण्याचा प्रयत्न केला. याविषयी बोलताना मुलीच्या पालकांनी संताप झाला पाहिजे. माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकणाऱ्या माझ्या बापाला फाशी द्या, अशी संतप्त मागणी मुलीच्या आईने केली. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Pune Crime news)

या सगळ्या घटनेविषयी बोलताना मुलीच्या आई-वडिलांनी सांगितले की, आम्ही दोघे दिवसभर कामावर जातो. मी कपड्याच्या दुकानात कामाला जाते. माझे पती रिक्षा चालवतात. मी रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास कामावरुन घरी आले तेव्हा मुलीने मला हा सगळा प्रकार सांगितला. मी घरी पोहोचले तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. तसेच अंगावर नखांचे ओरखडे होते. माझ्या स्वत:च्याच बापाने माझ्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. त्याला फाशी झाली पाहिजे, अशी मागणी मुलीच्या आईने केली. 

या प्रकरणात पोलीस आम्हाला सहकार्य करत आहेत. मी कपड्यांच्या दुकानात काम करते. रात्री नऊ वाजता मी कामावरुन सुटल्यावर हा सारा प्रकार घडला. नंतर मुलीने आम्हाला सांगितले की, यापूर्वीही असाचा प्रकार घडला होता. पण तेव्हा ती गोष्ट आम्हाला माहिती नव्हती. मुलीने सांगितले की, आधीही आजोबांनी माझ्यासोबत असे केले होते. तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून ओढून घेत होते. तेव्हा मी बाहेर पळून गेल्याचे मुलीने आम्हाला सांगितले. आता दुसऱ्यावेळी लय मोठा किस्सा घडला. ही घटना काल रात्री घडली. पोलिसांनी आम्हाला सांगितले की, 'आम्ही तुमच्यासोबत आहोत. लय कालवा करु नका, लोकांना काही सांगू नका. कोणी मोर्चा वगैरे काढला तर दगडफेक होईल', असे मुलीच्या आईने सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola