Parth Pawar Notice : दोन टक्के मुद्रांक शुल्क भरा, पार्थ पवार प्रकरणात मुद्रांक शुल्क विभागाची नोटीस

Continues below advertisement
पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया (Amedia) कंपनीला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने ६ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. ‘अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे.’ आयटी पार्कसाठी (IT Park) जमीन असल्याचे सांगून मुद्रांक शुल्कात (Stamp Duty) सवलत घेतल्याचा आरोप आहे, मात्र मेट्रो सेस (Metro Cess) आणि एलबीटी (LBT) चे २ टक्के शुल्क थकवल्याने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणात उपनिबंधक रवींद्र सारू यांना निलंबित करण्यात आले आहे. या कथित जमीन घोटाळ्याच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, पुण्यात आंदोलन करत अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola