Parth Pawar Land Scam: पार्थ पवार जमीन प्रकरण, अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या भोवती जमीन घोटाळ्याच्या आरोपांचे वादळ उठले आहे. या प्रकरणामुळे अजित पवारांची राजकीय कोंडी झाली असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. 'या व्यवहारामध्ये एक रुपया पण दिला गेला नाही,' असा दावा करत अजित पवारांनी हा व्यवहार रद्द झाल्याचे जाहीर केले आणि आपला मुलगा पार्थ याला यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले. दुसरीकडे, शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केवळ व्यवहार रद्द करणे पुरेसे नसून, पार्थ पवार यांच्यासह सर्व दोषींवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. पुणे पोलिसांनी एफआयआरमध्ये फक्त सही करणाऱ्यांची नावे असल्याचे सांगितले आहे, तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याच भूमिकेचे समर्थन केले. मात्र, एबीपी माझाच्या हाती आलेल्या कागदपत्रांनुसार, पार्थ पवार यांनीच कंपनीच्या वतीने सहीचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला दिले होते, ज्यामुळे या प्रकरणात त्यांचा संबंध स्पष्ट होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola