TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा आढावा : 6 NOV 2025 : ABP Majha
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या पुणे येथील जमीन व्यवहार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मराठवाडा दौऱ्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. 'अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागतेय?' असा थेट सवाल शिवसेनेचे (UBT) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी पार्थ पवारांच्या कंपनीने ₹1800 कोटींची जमीन केवळ ₹300 कोटींना खरेदी केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ED आणि EOW चौकशीची मागणी केली आहे, तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी माहिती मागवून चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत 'सातबारा कोरा करू' या फडणवीसांच्या जुन्या भाषणाचा ऑडिओ ऐकवून सरकारवर निशाणा साधला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement