स्थानिक नेत्याकडे बोट दाखवत Parner च्या तहसीलदार Jyoti Deore यांचा आत्महत्येचा इशारा : ABP Majha
Continues below advertisement
Ahmednagar : पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केले आहे. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास तसेच वरिष्ठांचे दुर्लक्ष या बाबत सविस्तर कथन ऑडिओ क्लिप मध्ये केले आहे. इतकंच नाही तर लोकप्रतिनिधीकडून होणारा त्रास देखील त्यांनी सांगितला आहे. तहसीलदार यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
Continues below advertisement