Parliament Security Row | संसदेत CISF तैनातीवरून वाद, विरोधी पक्षांचा आक्षेप
संसदेमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांच्या उपस्थितीवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी, विशेषतः काँग्रेसनं, राज्यसभेच्या सभागृहात CISF जवानांना तैनात करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या संदर्भात राज्यसभेच्या उपसभापतींना पत्र लिहून आपला निषेध नोंदवला आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्याची मागणीही खर्गे यांनी केली आहे. यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "संसदेच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांचा भाग म्हणून सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत," असे रिजीजू यांनी म्हटले आहे. संसदेच्या सुरक्षेबाबतच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांनी याला लोकशाही हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न म्हटले आहे, तर सरकारने सुरक्षेचे कारण दिले आहे.