Parliament Security Breach:अमोलशी 2 दिवसांत बोलणं करुन द्या,नाहीतर आत्महत्या करु :Amol Shinde Family
मुंबई: अमोलने जे काही केलं ते बेरोजगारीच्या कारणामुळं केलं, त्याने सैन्य भरतीचे सहा वेळा प्रयत्न केले होते आणि त्याने रनिंगची चँमिपयनशिपही जिंकली आहे अशी माहिती अमोल शिंदेच्या (Amol Shinde) लकांनी दिली आहे. अमोलशी आमचं बोलणं करून द्या अन्यथा आत्महत्या करू असा इशाराही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला. गुणवत्ता असून ही मुलास नोकरी नाही मिळाली. रोजगारी करणाऱ्या लोकांच्या मुलास नोकरी लागत नाही का असा प्रश्न धनराज शिंदे यांनी उपस्थित केला आहे. मुलाशी बोलणे नाही झाल्यास मी आत्महत्या करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. बुधवारी संसदेची सुरक्षा (Parliament Security Breach Case) भेदून चार युवक आतमध्ये गेले, त्यातील दोघांनी लोकसभेमध्ये जाऊन धूर सोडला. दोन तरूणांनी संसद परिसरात धुमाकूळ घातला. त्यानंतर या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एक आरोपी अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील आहे.