Parliament : 12 खासदारांच्या निलंबनावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न : Abp Majha

संसदेच्या अधिवेशनात पहिले तीन आठवड्यांचं कामकाज गदारोळात वाया गेले. आता एका आठवड्याचं कामकाज उरलं असताना  ज्या मुद्यावरून वाद सुरू आहे त्या १२ खासदारांच्या निलंबनावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरु केलेत. त्यासाठी निलंबन झालेल्या खासदारांच्या पक्षाच्या गटनेत्यांची आज बैठक बोलावण्यात आलीय.. शिवसेनेचेही २ खासदार निलंबित झाल्यानं आजच्या बैठकीचं आमंत्रण शिवसेनेलाही देण्यात आलंय.. पण सर्व पक्षांना बोलावलं नसल्यानं विरोधी पक्षांनी नाराजी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठकही होणार आहे. विरोधकांच्या एकजूटीपुढे सरकार झुकणार का? याची उत्सुकता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola