Parliament Session : भाजप खासदार Nishikant Dubey यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी, दुबेंना मराठीवरुन डीवचलं

लोकसभेत बोलताना खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. जो देश आणि समाज आपला इतिहास विसरतो, तो स्वतःला मातीत मिळवतो, असे सांगत इतिहासातून शिकले पाहिजे, असे दुबे म्हणाले. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना वाटते की नेहरूजींवर त्यांचा शिक्का आहे, पण ते देशाचे पहिले पंतप्रधान होते आणि त्यांच्या कार्यावर प्रश्न विचारण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, असे दुबे यांनी ठणकावून सांगितले. "लमहों ने खता की सदियों ने सजा पाई" (क्षणात झालेल्या चुकांची शिक्षा शतकानुशतके भोगावी लागते) या उक्तीचा संदर्भ देत, आपण भोगत असलेल्या शिक्षेबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी नेहरूंच्या 'ग्लिंप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' या पुस्तकाचा उल्लेख करत काँग्रेस आणि विरोधी पक्षांची मानसिकता तिथूनच तयार झाल्याचा आरोप केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola