Parinay Fuke On Nana Patole: गेल्या निवडणुकीत नाना पटोलेंनी पुतण्याचं डोकं फोडलं, परिणय फुकेंचा आरोप

Continues below advertisement

नाना पटोलेंनी पुतण्याचं डोकं फोडून रडलेत आणि निवडणूक जिंकली....साकोलीच्या सभेत परिणय फुके यांचा नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप.. मागच्या वेळेस (2019 ची विधानसभा निवडणूक) नाना पटोले यांनी *स्वतःच्या हातानं स्वतःच्या पुतण्याचं डोकं फोडलं.....आणि आपले अश्रू गाळले, रडत राहिले आणि मतं मागितलं.* आपल्या भागातील जनता यांच्या या मगरमच्छ अश्रुला वाहून गेलेत आणि नानांना निवडणुकीत निवडून दिलं. आणि आता साडेचार वर्षांपासून साकोली विधानसभा क्षेत्रातील जनता रडून राहिली. एकही विकास काम नाही झाला, एकही रोजगार निर्मिती झाली नाही. 2014 मध्ये प्रफुल्ल पटेल यांनी जो भेलचा प्रकल्प आणला त्यालाही रद्द करण्याचं पाप नाना पटोले यांनी केलं. तनसेपासून इथेनॉल बनविण्याचा कारखाना आणला, हे विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यात पाहिले तो इथेनॉल कारखाना बंद करण्याचं पाप नाना पटोले यांनी केलं. *नाना पटोले हे निवडणूक हरणार आहे, हे यांच्या लक्षात येतं, तसं हे निवडणुकीच्या शेवटच्या दोन चार दिवसाआधी काही तरी गडबड करतात, काही ना काही षडयंत्र रचतात. काही दिवसांपूर्वी याची गाडी ट्रक नं थोडीशी खरचटली. आणि यांच्या डोक्यातील ट्यूब लाईट जळला आणि आतातर आपण हारून राहिलो...काहीतरी सहानुभूती लोकांची घेतली पाहिजे, आणि त्यानंतर त्यांनी हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र असल्याचे नानांनी सांगितल्याचे गंभीर आरोप* भंडारा - गोंदियाचे माजी राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर लावला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram