Parbhani Selu : पुराच्या पाण्यात वाहत गेलेले तीन जण बचावले, बैलांसह बैलगाडी पाण्यात, बैलांचा मृत्यू
परभणीच्या मानवत रोड येथे ओढ्याला अचानक आलेल्या पुरात वाहून जाणारे 3 जण बचावले असून बैल जोडी मात्र वाहून गेल्याची घटना घडलीय. मानवत येथील शेतकरी राधाकिशन मल्हारी येडे यांची सेलू रोड वर शेती असून त्यासाठी त्यांना ओढ्यातून रस्ता आहे.काल मानवत रोड येथे पाऊस नव्हता त्यामुळे नियमितपणे शेतातील मिरची तोडण्यासाठी त्यांचा सालगडी उमेश पवार, दैवशाला पवार व अन्य एक महिलेसोबत बैलगाडीतून शेताकडे जात होते.