Parbhani Rain : परभणीत संततधार, ओढे, नदी-नाल्यांना पूर ; अनेक गावांचा संपर्क तुटला

Continues below advertisement

परभणी जिल्ह्यात काल सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं ओढे, नाले, नद्या ओसंडून वाहू लागल्यात. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. लोअर दुधना प्रकल्प 84% भरल्यानं प्रकल्पाच्या 12  दरवाजांमधून 12 हजार 192 क्युसेक वेगानं पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आलंय. त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.. सध्या जिल्ह्यातील मानवतच्या सावंगी मगर, सेलूतील साळेगाव-हातनुर पुलावरून पाणी जात असल्यानं रायपुर, हातनुर, वालुर साळेगाव, निपाणी टाकळी इथं कसुरा नदीवरील पुलावरून पाणी जात असल्यानं परभणीचा संपर्क तुटलाय आहे. सध्याही सर्वत्र पाऊस सुरू असल्यानं परिस्थिती बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram