Parbhani Rain Deficit | परभणीत पावसाची दडी, पिके वाळली, शेतकऱ्याची दुबार पेरणीसाठी मदतीची हाक

परभणी जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी हवा तसा पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी, वीस टक्के पेरण्या अजूनही बाकी आहेत. जून महिन्यात १०५ मिलिमीटर पाऊस झाला, तर जुलै महिन्यात (बारा जुलैपर्यंत) केवळ ३५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत जुलै महिन्यात ५० टक्के पावसाची तूट आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्यांची पिके आता वाळू लागली आहेत. सोयाबीनसारखी पिके वाढ खुंटल्याने धोक्यात आली आहेत. प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही वाढ झालेली नाही. येलदरी प्रकल्पात ५१ टक्के, तर लोअर दुधणा धरणात ३४ टक्के पाणीसाठा आहे. शेतकऱ्यांना आता ही पिके कशी जगवायची याची चिंता लागली आहे. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. "आता हे दुबारा पेरणी करावं लागतील त्यानु दुबार पेरणी करण्यासाठी काहीतरी सरकारनं मदत कराय पैसे शेतकऱ्याला थोडी फारक आहोय ना त्यांच्या त्यांच्या प्रस्तुती आता आमच्यात होतं तेवढं आम्ही घातलो शेतामध्ये आता आमच्या जो जगायला सुद्धा काही नाही राहिलेलं नसून," असे एका शेतकऱ्याने सांगितले. आता पाऊस पडला तरी पिकांची वाढ होणार नाही आणि उत्पन्न घटणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परभणी जिल्ह्याची सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७०० मिलिमीटर आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola