Parbhani Rain : परभणीत जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठा फटका, अडीच लाख हेक्टरवर नुकसान
Continues below advertisement
परभणी जिल्ह्यात यंदा पावसाने कहर केला आहे जून ते सप्टेंबर 28 पर्यंत जिल्ह्यात तब्बल 1 हजार 85 मिलिमीटर पाऊस झाला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आलाय प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.48 तास झालं पाऊस थांबून तरीही गोदावरी नदी काठच्या शेतात अजूनही पाणीच पाणी झाले आहे.यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले मात्र अद्यापही ना पिक विमा मिळालाय ना पंचनामे पूर्ण झाले त्यामुळे सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्याची मागणी परभणीच्या शेतकऱ्यांनी केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी.
Continues below advertisement