CAA | सीएएविरोधात ठराव मंजूर करणारे परभणीतील भाजपचे दोन नगराध्यक्ष निलंबित
सीएएविरोधात नगरपरिषदेत ठराव करणाऱ्या परभणीतील दोन नगराध्यक्षांवर भाजपनं निलंबनाची कारवाई केली आहे. पालम नगरपरिषदचे नगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे आणि सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद हरीभाऊ बोराडे यांना पक्षातून निलंबित केल्याची धोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.