Oxygen Production : परभणी : हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट 1 मेपासून सुरू होणार

Continues below advertisement

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. याच पार्श्वभूमीवर आज परळीच्या थर्मल पावर प्लांट मधील युनिट क्र. 8 चा ऑक्सिजन निर्मिती प्लांट अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात शिफ्ट केला आहे. ज्याचे ऑनलाईन उद्घाटन आज बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. या प्लांटची हवेतून तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे.

थर्मल पावर प्लांट मधील या ऑक्सिजन निर्मिती प्लांटद्वारे दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन हवेतून वेगळा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथील एसआरटी ग्रामीण रुग्णालयात चोवीस तासात साधारण 300 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन तयार होईल व यामुळे येथील ऑक्सिजनचा तुटवडा कायमचा मिटणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram