Parbhani : लग्नाच्या वरातीत गाणं गात असताना महिलेला हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू ABP Majha

माणसावर कधी कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही.. कारण परभणीत एका लग्नाच्या वरातीत गाणं गात असताना महिलेला हृदयविकाराचा झटका येऊन  मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. आणि हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालाय. आनंदाच्या क्षणी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परभणी जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय.. परभणी शहरातील पाथरीमध्ये काल एक लग्न होतं..  मोठ्या थाटामाटात या लग्नातील नवरदेवाची वरात निघाली होती.. ज्यात एकीकडे बँड वाजत होता.वराती नाचत होते आणि याच वरातीत महिला गाणं गात होती.. गाणं गात असतानाच संगीता गव्हाणे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि खाली कोसळल्या.. आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola