Parbhani : परभणी, हिंगोलीत लढत स्पष्ट नाही; अर्ज भरण्याची तारीख आली तरी उमेदवार ठरेना!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppParbhani : परभणी, हिंगोलीत लढत स्पष्ट नाही, अर्ज भरण्याची तारीख आली तरी उमेदवार ठरेना!. परभणी हिंगोली लोकसभा मतदार संघातील लढती अद्याप स्पष्ट नाहीत. दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदार संघात आज अधिसुचना जारी केली जाणार आहे ज्यात मराठवाड्यातील परभणी,नांदेड,हिंगोलीसह विदर्भातील बुलढाणा,अमरावती,वाशीम यवतमाळ,अकोला अन वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे.आज अधिसुचना जारी करण्यात आल्यानंतर या 8 ही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज विक्री केले जाणार आहेत तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील अधिसूचना जारी होत असताना अजूनही बऱ्याच ठिकाणी चित्र स्पष्ट झालेले नाहीये महायुती मधील शिवसेना अन राष्ट्रवादी ची उमेदवार आज जाहीर केले जाणार आहेत ज्यामध्ये परभणी हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील महायुतीचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.