Parbhani : परभणीत नव्या निर्बंधांना हरताळ, पहाटेपासूनच मार्केट यार्डमध्ये मोठी गर्दी
कोरोनाच्या अनुषंगाने निर्बंध लागू केले असताना गर्दी करू नका मास्क वापरा अशा प्रकारचं आवाहन प्रशासन करत असताना परभणीच्या मार्केट यार्डात पहाटेपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे परभणीच्या पाथरी रस्त्यावरील मार्केट यार्डमध्ये भाजी विक्रेते असतील बीट धारक असतील भाजी खरेदीदार यांची मोठी गर्दी पहाटेपासून पाहायला मिळाली ना कोणाच्या चेहर्याचा मास्क आहे ना सोशल डिस्टंसिंग पालन केले जात आहे आणि यामुळेच परभणीतील ही गर्दी धडकी भरवणारी गर्दी आहे.महत्त्वाचे म्हणजे महापालिका,स्थानिक प्रशासन यांचं पथक ही इथे दिसत नाहीये त्यामुळे सरकारच्या निर्बंधाचा काही फायदा झाला का असा प्रश्न निर्माण झालाय.
Tags :
Maharashtra Parbhani Parbhani Corona Omicron Mumbai Omicron Omicron Pune Omicron Cases India Omicron