Mahapalikecha Mahasangram : महापालिकेचा महासंग्रास, परभणीत नागरिकांच्या समस्या काय?
Continues below advertisement
परभणी शहराला वेढलेल्या समस्यांवर आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तरुणाईने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'पुण्या-मुंबईला राहणारे लोक हुशार आहेत आणि आम्ही काय गाढव आहोत का?,' असा संतप्त सवाल तरुणांनी उपस्थित केला आहे. परभणीची तुलना जर्मनीशी केली जाते, पण प्रत्यक्षात शहरात रस्ते, पाणी आणि कचरा या मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. 2011 मध्ये 'ड' वर्ग महानगरपालिकेचा दर्जा मिळूनही शहराचा विकास रखडला आहे. कचरा व्यवस्थापनासाठी गंगाखेड रोडवरील डम्पिंग यार्ड बंद असल्याने शहरात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच, कॉलेज परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले असून, महानगरपालिकेकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement