Parbhani Accident : परभणीत बस-दुचाकीच्या अपघातात 3 ठार, 2 गंभीर जखमी ABP Majha

परभणीच्या चारठाणा परिसरात एकाच दुचाकीवरुन पाच जणांना प्रवास करणं त्यांच्या जीवावर बेतलंय.. या दुचाकीचा आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला.. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.. तर २ जण गंभीर जखमी झालेत. अतिक  तांबटकरी, शेख अमीर आणि शेख मोबीन अशी मृतांची नावं आहेत. वसिम खय्युम, विखार रसिक हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे पाचही जण एकाच दुचाकीवरुन प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीची आणि एसटीची समोरासमोर धडक झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola