Parambir Singh : परमबीरसिंहांचं निलंबन झालं ते प्रकरण काय होतं ? का झाली होती कारवाई? ABP Majha

Continues below advertisement

Parambir Singh : परमबीरसिंहांचं निलंबन झालं ते प्रकरण काय होतं ? का झाली होती कारवाई? ABP Majha

मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटकांचं प्रकरण आणि मनसुख हिरेनची हत्या या प्रकरणात परमबीर सिंह यांना निलंबित करण्यात आलं होतं. परमबीर सिंह हे जून २०२२मध्ये पोलीस सेवेतून निवृत्त झाले होते. पण त्याआधी म्हणजे डिसेंबर २०२१ पासून त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. पण परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आल्यामुळं, डिसेंबर २०२१ ते जून २०२२ हा कालावधी ते कर्तव्यावर असल्याचं मानण्यात येईल, असं राज्य सरकारच्या आदेशात म्हटलं आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी, भ्रष्टाचार आणि गैरवर्तणुकीच्या अनेक तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळण्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी त्यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलं होतं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram