Maharashtra Politics'शेलारांनी नकळत Fadnavis यांनाच पप्पू ठरवलं', Uddhav Thackeray यांचा भाजपला टोला

Continues below advertisement
मतदार यादीतील घोळाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात 'पप्पू' शब्दावरून नवीन वाद पेटला आहे. या राजकीय संघर्षात उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, आणि आशिष शेलार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेला आहे,' असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीतील त्रुटींवरून एक प्रेझेंटेशन दिल्यानंतर, 'आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनण्याचा प्रयत्न करू नये,' अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर भाजपकडून आशिष शेलार यांनी 'दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सगळ्या पप्पूंचा पर्दाफाश करू,' असे विधान केले. याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला. भाजपने दुबार मतदार याद्यांमध्ये केवळ मुस्लिम समाजाच्या नावांकडे ठाकरे कानाडोळा करत असल्याचा आरोपही केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola