Pankaja Munde | पंकजा मुंडे यांची ओबीसी जनगणनेची मागणी; गोपीनाथ मुंडेंचा जुना व्हिडीओ ट्वीट
बई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडेचा ओबीसी जनगणनेच्या मागणीचा एक व्हिडीओ शेअर करत ओबीसींची जनगणना व्हावी अशी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. या संंबंधी हिंदीमध्ये दोन ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी ही मागणी केली आहे.
पंकजा मुंडे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, "आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आमचीही गणना करा. ओबीसी जनगणनेची आवश्यकता आणि अपरिहार्यता आहे. कुछ यादे और कुछ वादे."
पंकजा मुंडे यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "2021 ची जनगणना जातीनिहाय होणं आवश्यक आहे. गावागावातून उमटलेला आवाज हा राजधानीपर्यंत जरुर पोहचेल यात शंका नाही."