माझ्या पायाला फोड आले होते तरी मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला... पंकजा मुंडे गहिवरल्या

मुंबई :  मोदींच्या मंत्रिमंडळात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Prital Munde) यांना संधी न मिळाल्याच्या मुद्द्यावर आज भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मौन सोडलं. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज बोलताना गोपीनाथ मुंडे यांची आठवण निघाल्यानंतर पंकजा मुंडेंना गहिवरुन आलं. पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे निवडून आले, त्या निवडणुकीला मी एकटीच होते. आमच्या इथे जिल्ह्यात आमदार नव्हता. माझ्या पायाला फोड आले होते आणि मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला आहे, हे सांगताना पंकजा मुंडे गहिवरल्या. त्यांनी पुढं म्हटलं की, प्रीतमताई वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक करणारच होत्या. पण आत्ता जी निवडणूक त्या जिंकल्या, ती निवडणूक त्या त्यांच्या मेरिटवर जिंकल्या. तरीही प्रीतम मुंडे निवडणुकीच्या उमेदवार आहेत की नाही इथून चर्चा होते, असं त्यांनी म्हटलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola