Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, काय बोलणार याकडे लक्ष
Continues below advertisement
पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावर सुरू झाला आहे. या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळाव्यासाठी रेकॉर्डब्रेक गर्दीची अपेक्षा व्यक्त केली जात होती आणि ती प्रत्यक्षात आली. पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, "हा काही राजकीय मेळावा नाही की जो मी थोडा नंतर घेऊ शकते. ही समोल्लंघनाची परंपरा आहे. दसऱ्याला इथे येऊन सोनं उधळण्याची आत्तापर्यंतची आमची रीत आहे आणि म्हणून दर्शनाला मी आले आहे." यावेळी पूरपरिस्थिती असूनही मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी गूळ, साखर आणि पूरणपोळीचे साहित्य आणले. हे साहित्य एकत्र करून उद्या त्याचे वितरण केले जाईल. कार्यकर्त्यांना बांधावर जाऊन पूरग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी बांधावर जाऊन लोकांना रेशन वाटप केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement