Pankaja Munde on Dhananjay Munde|संजय राठोडांप्रमाणे धनंजय मुंडे यांनीही राजीनामा द्यावा:पंकजा मुंडे
Continues below advertisement
मंबई : आपण राज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणवतो आणि या राज्यात पुढच्या पिढीसाठी जी उदाहरणं नेत्यांकडून प्रस्थापित केली जात आहेत ती दुर्दैवी आहेत. फक्त आणि फक्त सरकार, युती टीकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं जात आहे असा नाराजीचा सूर आळवत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी (Pooja Chavan Case) प्रतिक्रिया दिली. मुंबईत एका पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.
पूजा चव्हाण प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राज्यातील वनमंत्रीपदी असणाऱ्या संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्या धर्तीवर आता रेणू शर्मा, करुणा शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही पंकजा मुंडे यांनी केली आहे.

Tags :
Dhananjay Munde Maharashtra Govt Pankaja Munde on Sanjay Rathod Sanjay Rathod Resignation Pooja Chavan Suicide Case Pune Minister Sanjay Rathod Sanjay Rathod Resign Pooja Chavan Death Case Pooja Chavan Suicide Pooja Chavan Pooja Chavan Suicide Case Sanjay Rathod Pune Suicide Pankaja Munde CM Pune Uddhav Thackeray BJP Shiv Sena