Pankaja Munde Dasara : सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावा, पंकजा मुंडे यांचा भाजपला घरचा आहेर

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर आयोजित करण्यात आला होता. प्रशासनानं नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली आहे. या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं. आजचा सोहळा खूप देखणा आहे,  देशात असा सोहळा कुठे होत नसेल, असं म्हणाल्या. पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने भगवानगडावर दाखल झाल्या होत्या. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मी हेलिकॉप्टरमधून भगवान बाबांवर फुलं टाकत होते. तसेच, मी तुमच्या पायावरही फुलं टाकत होते. कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी फुलं टाकत नव्हते, तर भगवानदादांसाठी आणि तुमच्यासाठी वाहत होते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आजची दसऱ्याची भक्ती आणि शक्तीची जी परंपरा कायम ठेवण्यासाठी तुम्ही घरची पुरणपोळी सोडून इथे आले आहात, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola