OBC Reservation साठी कोर्टात धाव घ्या, Pankaja Munde यांचं सर्वपक्षीय नेतेमंडळींना आवाहन ABP Majha

Continues below advertisement

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर २१ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीबाबत संभ्रम कायम आहे. दोन दिवस उलटले तरी निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव अजून निवडणूक आयोगाकडे गेला नसल्याचं कळतं. हा प्रस्ताव आज आयोगाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आयोग काय भूमिका येईल याकडे उमेदवार आणि मतदारांचंही लक्ष लागलंय. १०५ नगर पंचायती आणि दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुका अवघ्या ४ दिवसांवर येऊन टेपल्या आहेत. २१ तारखेची निवडणूक ठरल्याप्रमाणे होईल, तसंच ओबीसींसाठी आरक्षित प्रभागातील स्थगित झालेल्या निवडणुका जानेवारीमध्ये घेऊन  निकाल एकाचवेळी जाहीर करण्याचा निर्णय आयोग घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती एबीपी माझाला सूत्रांकडून मिळालीय. निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे घोषणेकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

ओबीसी रिक्त जागेवर आता ओपन अर्ज दाखल करणार असल्याने ओबीसींवर अन्याय होईल असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram