Pankja Munde Sugar Mill: पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या विक्रीचं प्रकरण, रविकांत तुपकर न्यायालयात जाणार
Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात दोन मोठ्या घडामोडींमुळे वादळ निर्माण झाले आहे. एकीकडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर साखर कारखाना विक्री प्रकरणी फसवणुकीचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केला आहे, तर दुसरीकडे मुंबईतील (Mumbai) कबूतरखान्याच्या (Kabutar Khana) मागणीवरून दैनिक सामनाच्या (Dainik Saamana) अग्रलेखातून जैन समाजाला (Jain Community) लक्ष्य करण्यात आले आहे. 'पंकजा मुंडेंनी सुरुवातीला भाडेतत्वावर दिलेल्या कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे,' असा थेट आरोप रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. याच आरोपाखाली आता तुपकरांची संघटना न्यायालयामध्ये दाद मागण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, जैन समाजाने मुंबईत कबूतरखान्यासाठी केलेल्या मागणीवर दैनिक सामनाने अग्रलेखातून टीका केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement