Pandharpur : अक्कलदाढ काढायला गेली अन् जीव गेला, पंढरपूर शहरातील धक्कादायक प्रकार ABP Majha

Continues below advertisement

अक्कलदाढ काढायला आलेल्या महिलेचा जीव गेला, दाढ काढण्यासाठी केलेल्या उपचारानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. जयश्री चव्हाण असं मृत महिलेचं नाव आहे. अक्कलदाढ काढण्यासाठी डॉक्टरांनी जयश्री यांना भुलीचे इंजेक्शन दिले आणि दाढ काढली. अशक्तपणा जाणवू लागल्यानं डॉक्टरांनी एक गोळी दिली. त्यानंतर जयश्री यांना उलटी होऊन त्या बेशुद्ध झाल्या. यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच जयश्री यांचा मृत्यू झाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram